मुंबई : डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम (Paytm)च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतीत सूत्रांनी आमची सहयोगी वृत्तवाहिनी झी बिझनेसला माहिती दिली आहे. सेबीने पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 कम्युनिकेशंसचे ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टर(DRHP) ला मंजूरी दिली आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर म्हटले की, सेबीने पेटीएमच्या आयपीओला मंजूरी दिली आहे''. पेटीएमला 1.47-1.78 लाख कोटींच्या वॅल्युएशनचा अंदाज आहे. अमेरिकेतील वॅल्युएशन एक्सपर्ट अश्वथ दामोदरन यांनी फर्मच्या नॉन लिस्टेड शेअर्सची किंमत 2 हजार 950 रुपये प्रति शेअर लावली आहे.


फ्रेश इक्विटीतून 8,300 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन


कंपनीच्या डीआऱएचपीच्या मते, Paytm साधारण 16,600 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारणार आहे. यामध्ये फ्रेश इक्विटीतून 8300 कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेल (OFS)तून 8300 कोटी रुपयांचा सामावेश आहे. पेटीएममध्ये सॉफ्ट बँक, वॉरेन बफेट आणि ENT इन्वेस्टमेंटसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी पैसा लावला आहे. पेटीएमचे 2 कोटीहून अधिक मर्चंट आहेत.