मुंबई : केएफसी आणि पिज्जा हट रेस्टॉंरट चालवणारी सैफायर फुड्स (Sapphire Foods)इंडिया लिमिटेडचा आयपीओ (IPO)9 नोव्हेंबर  रोजी खुला होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपर्यंत म्हणजेच 11 नोव्हेंबरपर्यंत आयपीओ खुला राहणार आहे. आयपीओ पूर्णतः (OFS)च्या स्वरूपात असेल. याअंतर्गत कंपनीचे प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअरधारकांकडून 17,569,941 इक्विटी शेअरची विक्री कऱण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीओतून 1500 - 2000 कोटी रुपये उभारण्याचा अंदाज
कंपनीला आयपीओच्या माध्यमातून 1500 - 2000 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. सैफायर फुड्सला समारा कॅपिटल, गोल्डमॅन सॅश, सीएक्स पार्टनर्स आणि एडलवाइस सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांचे समर्थन आहे. सैफायर फु्ड्सचे 31 मार्च 2021 पर्यंत भारत आणि मालदिमध्ये 204 केएफसी रस्टॉरंट आणि भारत श्रीलंका आणि मालदिवमध्ये 231 पिज्जा हट रेस्टॉंरट होते.


22 नोव्हेंबरला लिस्ट होणार?
कंपनी हा शेअर 22 नोव्हेंबर लिस्ट करू इच्छिते. यावर्षी कंपनीला आर्थिक वर्ष 2021च्या आधी 1019.62 कोटींचा ऑपरेशन महसूल मिळाला आहे. यादरम्यान कंपनीचा नेट लॉस मागील वर्षाच्या 159 कोटींच्या तुलनेत फक्त 99.89 कोटी रुपये राहिला आहे. कंपनीची एकुण उधारी 75.66 कोटी रुपये होती.


कोरोना संसर्गामुळे परिणाम
कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोनाकाळात कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. आता कंपनीचा व्यवसाय पुन्हा पुर्वरत होत आहे.