मुंबई : शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये 2022 च्या बाजाराच्या अंदाजाबाबत भीतीचे वातावरण आहे. सध्या त्यांना बाजारासाठी काहीही सांगणे कठीण होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अल्पावधीत ज्या पद्धतीने बाजाराची हालचाल दिसून आली आहे, ती फारच कमी आहे. परंतु 2022 मध्ये, बाजार श्रेणीबद्ध राहण्याची अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारात ना 2021 सारखी गती आहे ना 2020 सारखी मोठ्या घसरणीची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेच्या मजबूत रिकव्हरीमुळे बाजाराला पाठिंबा मिळेल. 2022 मध्ये, इन्फ्रा, कॅपिटल गुड्स, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील काही स्टॉक्स चांगला परतावा देऊ शकतात.


हेदेखील वाचा - स्टॉक मार्केट गुरू राधा किशन दमानी यांची मोठी खेळी, 'या' शेअरमध्ये वाढवली गुंतवणूक


झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांच्याशी झालेल्या संवादात प्रभुदास लीलाधर ग्रुपचे जॉइंट एमडी दिलीप भट यांनी बाजारावर आपले मत मांडले.


निफ्टी 16000 ते 19000 च्या रेंजमध्ये


दिलीप भट म्हणतात की, 2022 मध्ये बाजार एका रेंजमध्ये दिसेल. निफ्टीमध्ये 16000 ते 19000 ची रेंज पाहता येईल. अल्पावधीत, बाजार काही काळासाठी अस्थिर मूडमध्ये असेल. 


येत्या वर्षाबद्दल बोलायचे तर गुंतवणूकदारांची व्यावसायिक कसोटी लागणार आहे. पण बाजारात ना फारशी तेजी अपेक्षित आहे ना फारशी घसरण होण्याची शक्यता आहे.


हेदेखील वाचा : Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने 8000 रुपयांनी झालं स्वस्त


बाजार खाली न जाण्याचे कारण म्हणजे अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करत आहे. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये अधिक वाढ होईल. त्यामुळे ते खाली आल्यावर बाजारात खरेदी होईल.


किरकोळ गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. एसआयपी वाढत आहेत, निधीचा प्रवाह मजबूत आहे. इक्विटीमध्ये पैसा येत आहे.