मुंबई : सरकारी गोल्ड बाँड योजना 2021-22 ची 8 वी मालिका आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबरपासून 5 दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. हे बॉंन्ड बँका, SHCIL, निवडक पोस्ट ऑफिस आणि NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजद्वारे बाँडची विक्री केली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी गोल्ड बाँड योजनेची 8 वी मालिका आजपासून म्हणजे 29 नोव्हेंबरपासून 5 दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. RBI च्या माहितीनुसार, SGB च्या इश्यू किंमत 4,791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.


SGB ​​कसे खरेदी करावे
ग्राहकांना SGB खरेदी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल पद्धतीनेही बाँड खरेदी करू शकतात. बाँड बँकांद्वारे (लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), निवडक पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) मध्ये विकले जाईल


ऑनलाइन खरेदीवर 50 रुपयांची सूट
आरबीआयच्या म्हणण्यानुसार बाँडची इश्यू किंमत 4,791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.


सरकारने रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून, ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी, गोल्ड बॉण्डची इश्यू किंमत 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल.


योजना काय?
सरकारने 2015 मध्ये Sovereign Gold Bond Scheme सुरू केली होती. SGB ​​योजना भारत सरकारने 5 नोव्हेंबर 2015 रोजी अधिसूचित केली होती.


गोल्ड बॉण्ड्स भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करते आणि त्यांना सरकारी हमी असते. आतापर्यंत सुवर्ण रोख्यांचे आठ हप्ते जारी करण्यात आले आहेत.