L&T, इंडसइंड बँक, बजाज ऑटो सारखे दमदार स्टॉक देणार सुपरहिट परतावा; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला
सणासुदीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. बाजारात क्वॉलिटी तसेच मजबूत शेअर्सवर एक्स्पर्टने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. बाजारात क्वॉलिटी तसेच मजबूत शेअर्सवर एक्स्पर्टने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. येत्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दमदार परताव्याची संधी मिळणार आहे.
larsen and toubro
लार्सन आणि टुब्रोमध्ये मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने 2175 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्या शेअरचा भाव 1821 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या स्तरावर शेअर्सची खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना 20 टक्क्याचा परतावा मिळू शकतो.
SBI life insurance
एसबीआय लाइफ इश्योरंन्समध्ये मोतीलाल ओस्वालने 1500 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. सध्याचा भाव 1171 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या स्तरावर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 28 टक्के रिटर्न मिळू शकतो. मागील एका वर्षात या शेअरने 51 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
IndusInd Bank
इंडसइंड बँकेत मोतीलाल ओस्वालने 1400 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. शेअरचा सध्याचा भाव 1171 रुपयांच्या आसपास आहे. टार्गेटच्या हिशोबाने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. मागील एका वर्षात 100 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.
Bajaj Auto
बजाज ऑटोमध्ये आयसीआयसीआय सेक्युरिटीजने 4934 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणनूकीचा सल्ला दिला आहे. सध्याचा भाव 3713 रुपयांच्या हिशोबाने गुंतवणूकदारांना 1221 रुपये प्रतिशेअरपर्यंत परतावा मिळू शकतो. मागील वर्षभरात शेअरने 26 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
Mahindra LifeSpace Developers
महिंद्रा लाइफस्पेस डेवलपरमध्ये आयसीआयसीआय सेक्युरिटीजने 339 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.