Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 2 स्टॉकसह या कंपन्यांमध्ये तेजीचा ट्रेंड; तुम्ही खरेदी केले का?
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या दोन स्टॉकसह अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये सध्या मोठी तेजी असल्याचे दिसून येतेय
मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या दोन स्टॉकसह अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये सध्या मोठी तेजी असल्याचे दिसून येतेय. जवळपास 20 हून अधिक अशा कंपन्या आहेत की त्या गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा देऊ शकतात. राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील 2 स्टॉकमध्ये फोर्टिस हेल्थकेअर (Fortis Healthcare)आणि डेल्टा कॉर्प ((Delta Corp))हे दोन शेअर आहेत. दोन्ही शेअर जबरजस्त मजबूतीसह व्यवहार करीत आहेत.
राकेश झुनझूनवाला यांच्या या दोन स्टॉकचा सध्याचा भाव
फोर्टीस हेल्थकेअरचा भाव बुधवारी 267 रुपये होता. तसेच डेल्टा कॉर्पच्या शेअरचा भाव बुधवारी 177 रुपये होता. MACDच्या अनुमानानुसार येणाऱ्या दिवसांमध्ये दोन्ही स्टॉकमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
या शेअर्समधूनही दमदार कमाईची संधी
जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, टाटा एलेक्सी, माइंडट्री, एस्टर डीएम हेल्थ केअर, स्पेंसर रिटेल, अपोलो हॉस्पिटल, वैशाली फार्मा, अरविंद फॅशन, आणि विकास डब्लू एसपीमध्ये पैसे गुंतवले असतील तर या शेअर्सपासून तुम्हाला नक्कीच मोठी कमाई होऊ शकते.
मिडकॅप शेअर्समधूनही उत्तम परतावा
बाजारात असे अनेक मिडकॅप शेअर्स आहेत ज्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. वॅल्युएशनसुद्धा आकर्षक आहे. पुढे हे स्टॉक मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याची क्षमता ठेवतात.अशाच मिडकॅप शेअर्समध्ये Jayant Agro, Syngene International, Max healthcare, FDC, Avant Feeds आणि Doller Industries इत्यादी आहेत.
या शेअर्सचे सेंटिमेंट चांगले आहेत, शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्मसाठी धमाकेदार रिटर्न देऊ शकतील.