मुंबई : भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही शेअर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. आम्ही तुमच्या पोर्टफोलियोला मजबूत बनवण्यासाठी भन्नाट शेअर घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला येत्या काळात चांगला रिटर्न मिळू शकतो. विशेष म्हणजे हा शेअर 100 रुपयांपेक्षाही कमी आहे. जर बाजारातून नफा कमवायचा असेल तर या शेअरची निवड तुम्ही करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी AVT Natural Products हा शेअर निवडला आहे. संदीप जैन यांच्या मते कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. ही कंपनी नॅचरल प्रोडक्ट बनवते. सध्याच्या दिवसांममध्ये हर्बल प्रोडक्टचे महत्व लोकांना पटले आहे.यामुळे कंपनीच्या रिझल्टवर चांगले परिणाम दिसत आहे. दक्षिणेतील जूनी कंपनी असल्याने कंपनीच्या प्रमोटर्सकडे 75 टक्के शेअरहोल्डिंग आहेत. त्या मुळे कंपनीची विश्वासार्हता आणखी वाढते.


जैन यांच्यामते कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. कंपनीवर फार विशेष कर्ज नाही. 0.17 टक्के म्हणजेच 52-53 कोटी डेट इक्विटी आहे. डिविडंड 1 टक्के यील्ड आहे. गेल्या 3 वर्षातील नफा CAGR 25 टक्क्यांच्या आसपास आहे.  जून 2020 मध्ये साधारण 8 कोटीचा PAT होता.


सध्या कंपीचा शेअर 76 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. सध्याच्या लेव्हलवर खरेदी करता येईल. चांगल्या परफॉमन्समुळे शेअरमध्ये ग्रोथ होईल. शेअरने 85 रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आता 20 टक्क्यांचा करेक्शन दिसून आला आहे. आता खरेदी करण्याची संधी असून  पहिले टार्गेट 80 रुपये तर दुसरे टार्गेट 90 रुपये ठेवता येईल.