मुंबई : शेअर बाजारात पैसा लावणे बँकेत खाते सुरू करण्याएवढी सोपी गोष्ट नसते. शेअर बाजाराच्या चालीवर तुम्हाला नेहमी नजर ठेवावी लागते. आपल्या मेहनतीच्या कमाईला कोणत्या चांगल्या स्टॉक्सवर लावावे याबाबत बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. असाच एक्सपर्टची चॉईस असलेला एक शेअर आम्ही तुम्हाला सूचवणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगल्या परताव्यासाठी  MMP Industries चे शेअर खरेदी करू शकता. तज्ज्ञांच्या मते हा क्वालिटी स्टॉक आहे.  MMP Industries बाबत अधिक माहिती घेऊ


 MMP Industries ही 1983 पासून कार्यरत चांगली कंपनी आहे. या कंपनीचे जुने नाव महाराष्ट्र मेटल पावडर लिमिटेड असे आहे. गेल्या 30 वर्षात कंपनीने एल्युमिनियम फाइल्स, एल्युमिनियम पेस्ट आणि एल्युमिनियम पावडरचीच्या प्रोडक्शनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. Nalco आणि Hindalco नंतर तिसरी सर्वात मोठी एल्युमिनियम सेक्टर मधील कंपनी आहे.
 
MMP Industries चा शेअर सध्या 147 रुपयांच्या आसपास आहे. हा शेअरमध्ये शॉर्टटर्मसाठी (6 ते 9 महिने) गुंतवणूक केल्यास 170 रुपयांचे लक्ष ठेवता येईल.