Stocks to buy : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारपेठेत एकंदरीतच घसरण पहायला मिळाली. बाजारपेठेतल्या या चढ- उतारामध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटसंबंधात अनेक स्टॉक आकर्षक कामगिरी करताना दिसत आहेत. उत्कृष्ट आउटलूक पाहता, ब्रोकरेज फर्मने दीर्घकालीन गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून 5 शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर चालू भावाच्यातुलनेत तब्ब्ल 29 टक्क्यांपर्यंत दमदार रिटर्न देऊ शकतात.


Amber Enterprises India Ltd


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Axis Securities ने Amber Enterprises कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईज प्रति शेअर 2504 रुपये आहे. 29 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 2245 रुपये होती. यामुळे गुंतवणूकदारांना प्रति शेअर 259 रुपये किंवा तब्बल 12 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न मिळू शकतो.


Barbeque-Nation Hospitality Ltd



IDBI Capital या ब्रोकरेज फर्मने Barbeque-Nation या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची प्रति टार्गेट प्राईज 1457 रुपये आहे. 29 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 1128 रुपये होती. या पद्धतीने, भविष्यात प्रति शेअर 329 रुपये किंवा तब्बल 29 टक्क्यांचा परतावा देऊ शकतो.  


Apollo Hospitals


Motilal Oswal या ब्रोकरेज फर्मने Apollo Hospitals च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या एका शेअरची टार्गेट प्राईज 5110 रुपये आहे. 29 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 4235 रुपये आहे. अशा पद्धतीने, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन प्रति शेअर 875 रुपये किंवा 21 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न मिळू शकतो.


Coal India Ltd



Coal India कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला Motilal Oswal या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईज  290 रुपये प्रति शेअर आहे. 29 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 231 रुपये होती. अशा पद्धतीने, भविष्यात हा शेअर 59 रुपये किंवा 26 टक्क्यांचा परतावा देऊ शकतो.


UltraTech Cement Ltd



Sharekhan या ब्रोकरेज फर्मने UltraTech Cement कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईज प्रति शेअर 7700 रुपये आहे. 29 ऑगस्ट 2022 या शेअरची किंमत 6510 रुपये आहे. यापद्धतीने, पुढे जाऊन हा प्रति शेअर 1190 रुपये किंवा 18 टक्क्यांचा परतावा देऊ शकातो.



(माहिती सौजन्य : झी बिझनेस)