Stocks to Buy: सध्या बाजारात आपल्याला अनेक तऱ्हेचे शेअर्स (Shares) उपलब्ध झालेले पाहायला मिळतील. जागतिक बाजारात एकीकडे मंदीचं (Recession) सावट फिरताना दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपुर्वी उतार-चढाव दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी शेअरबाजारात मोठी घसरण (Share Market Down) पाहायला मिळाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात नक्की काय काय बदल होत आहेत हे पाहणं गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं ठरत आहे. सध्या अमेरिकेत (US Share Market) शेअर बाजारात मंदी पाहायला मिळाली आहे. डाऊ जोन्स 0.13 टक्के, S&P 500 0.39 टक्के आणि Nasdaq 1.09 टक्क्यांनी घसरले आहे तर निक्केईमध्ये 214 अंकांची म्हणजेच 0.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. (stocks to buy these are the 5 stocks that can give unexpected returns)


काय सांगताय शेअर बाजारातील आकाडे? (What the Share Market Update Today) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SGX निफ्टी (Nifty) 22 अंकांनी वाढताना दिसतो आहे त्यामुळे सध्या मार्केटमध्ये चांगली वाढही होते आहे. प्रामुख्यानं सोमवारी देशांतर्गत बाजारपेठा या बंद होत्या. आता कंपन्या आपल्या तिसऱ्या तिमाहीत निकाल प्रसिद्ध करत आहे. ज्यात कंपनीच्या कमाईपासून ते कुठले शेअर्स ओपन झाले आहेत याची व्यवस्थित महिती तुम्हाला मिळू शकते. सध्या बाजारात ब्रोकरेज हाऊसनं काही दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) करण्याचा सल्ला दिला आहे. आज आलेल्या माहितीनुसार आयटी सेक्टरमध्ये (IT Sector) सर्वात वाईट शेअरचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो आहे. परंतु तुम्ही खाली काही दिलेल्या काही स्टॉक्सचा (Stocks) विचार करू शकता. या शेअर्समधून तुम्हाला 36 टक्क्यांपर्यंत मजबूत चांगला परतावा (Returns) मिळू शकतो. 


काय आहेत शेअर्स? (Today's Stocks to Buy)


सायएंट लि (Ciyent Ltd)
टार्गट प्राईझ (Target Price) - 910 रूपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) - 802 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 108 रुपये किंवा 13 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.


टिमकेन इंडिया (Timken India Pvt Ltd)
टार्गट प्राईझ (Target Price) - 3750 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) - 3,599 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 151 रुपये किंवा 4 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.
(नुवामा वेल्थने (Nuwama Weath) या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.)


कॅम्पस ऍक्टिव्हवेअर (Campus Activewear) 
टार्गट प्राईझ (Target Price) - 565 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) - 424 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 141 रुपये किंवा 33 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.
(जेएम फायनान्शियलने या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.) 


बर्जर पेंट्स (Berger Paints) 
टार्गट प्राईझ (Target Price) - 821 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) - 604 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 217 रुपये किंवा 36 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.


किम्स (KIMS) 
टार्गट प्राईझ (Target Price) - 1,740 रुपये 
21 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत (Share Price) - 1,489 रुपये
गुंतवणूकदारांना प्रति शेअर 251 रुपये किंवा 17 टक्के परतावा (Returns) मिळू शकतो.


कोणी गमावलं, कोणी कमावलं? (Today's Gainers and Losers in Share Market)


बॅकिंग क्षेत्र शेअर मार्केटमध्ये चांगली उसळी दाखवतो आहे तर आयटी क्षेत्र जोरात पडलं आहे. विर्पो, रिलायन्स आणि एचसीएल टेक तसेच टाटा स्टिल सारख्या कंपन्या खाली कोसळल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)