मुंबई : शेअर बाजारात जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर, स्टॉकची किंमत नाही तर, त्याची वॅल्यु पाहायला हवी.  कंपनीमध्ये ग्रोथ पोटेंशिअल किती आहे. हे पाहायला हवे.  क्वॉलिटी शेअर तुम्हाला नक्कीच जबरजस्त रिटर्न देत असतो. शेअर बाजारात दहा वर्षापूर्वीच्या काही स्टॉकचा परफॉर्मन्स पाहिला तर चहा कॉफीच्या भावात मिळत होते. आज गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Avanti Feeds
Avanti Feeds या शेअरने 10 वर्षात गुंतवणूकदरांना 226 पट रिटर्न्स दिले आहेत. 10 वर्षात या शेअरचा भाव 2.5 रुपयांनी वाढून 566 रुपये झाला आहे. म्हणजेच 16500 टक्के जास्त रिटर्न मिळाला आहे. 


Westlife Develop
Westlife Develop चा शेअर 10 वर्षापूर्वी फक्त 4 रुपये इतका होता. आज या शेअरची किंमत 530 रुपये इतकी आहे. गुंतवणूकदारांना 132 पट रिटर्न मिळाला आहे. 


Indo Count Inds
Indo Count Inds च्या शेअरने 10 वर्षात 11850 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 10 वर्षापूर्वी या शेअरचा भाव 2 रुपयांच्या आसपास होता. आज 230 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.


Vaibhav Global
हा शेअर 10 वर्षापूर्वी फक्त 7 रुपये इतका होता. आज या शेअरचा भाव 739 रुपये इतका आहे. म्हणजचे गुंतवणूकदारांना 106 पट रिटर्न्स मिळाले आहेत.