नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात या संसर्गाची सर्वात जास्त धग जाणवत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून विमानमार्गे येणारी वाहतूक थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 
देशात सध्या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर घातली आहे.  काल दिवसभरात देशात 60 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे  आता कोरोनावर नियंत्रण आणणं प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाचं बनलं आहे
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात भारतात ब्रिटन आणि आफ्रिकन स्ट्रेनचे रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परदेशातून येणारी उड्डाण थांबवा अशी मागणी होऊ लागली आहे. 
 
याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोन तृतीआंश लोकांनी ही मागणी केली आहे. दुसरी लाट थांबवण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत गेल्या वर्षीपासून परदेशात असलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणलं जात आहे.