भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा; आमचा `पतलू` शोधा, 25 हजार मिळवा!
Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत.
Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एरवी भडका कुत्रा पाहून बाजुने जाणारे देखील आता हरवले हा तोच कुत्रा तर नसेल ना? या शंकेने कुत्र्यांकडे पाहत आहेत.
रस्त्यावरुन फिरणारे बहुतांश जण भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असले तरी काहीजण त्यांना जवळ घेतात. खाऊपिऊ घालतात. बंगळूर येथील प्रेस्टिज शांतीनिकेतनच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना भटक्या कुत्र्याचा लळा लागला. त्यांनी त्याचे नाव पतलू असे ठेवले होते. सोसायटीतील सर्व नागरिक येता-जाताना पतलूची काळजी घ्यायचे. त्याला काय हवं-नको ते पाहायचे. दरम्यान अचानक एक दिवस सर्वांचा लाडका पतलू सोसायटीतून गायब झाला. यामुळे सोसायटीतील नागरिकांना खूप दु:ख झाले आहे.
केवळ दु:ख व्यक्त करण्यावरच हे सोसायटीतील सदस्य थांबले नाहीत. तर त्यांनी पतलूला शोधण्यासाठी जागोजागी बॅनर्स छापले आहेत. पतलूला शोधणाऱ्यास 25 हजारचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे. कुत्रा अचानक बेपत्ता झाल्याचा संशय असल्याने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे सोसायटीच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
प्रेस्टीज शांतीनिकेतन सोसायटीत एकूण 7 कुत्रे आहेत. त्यातील पतलू हा एकमेव नर कुत्रा असून तो सर्वांचा लाडका आहे. पतलू हरवल्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी 500 सीसीटीव्ही कॅमेरा फूटेजमध्ये त्याला शोधले. एक पायवाटीने तो टॉवरच्या तळघराकडे जाताना 3 जुलै रोजी पहाटे 3:12 वाजता शेवटचा दिसला. दुसऱ्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये एक सुरक्षा रक्षक पटलूच्या दिशेने वेगाने धावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोसायटीतील सदस्यांना पतलूसोबत नेमकं झालंय हे कळायला मार्ग नाही.
यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी सुरक्षा रक्षकाला गाठले. त्यावर आपण कार पार्किंगसाठी मदत करत असल्याचे त्याने सांगितले. पण सोसायटीत क्वचितच कार पार्किंगसाठी एखाद्याची मदत लागते हे त्यांना माहिती असल्याने गूढ आणखीनच वाढले.
Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
यानंतर सोसायटीतील सदस्यांनी पोलीस स्थानक गाठून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. यासोबतच निवासी सोसायट्यांच्या कल्याण अधिकाऱ्यांनाही शोधकार्यात सहकार्य करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी इस्टेट मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी भाष्य करण्यास नकार दिला.
एखाद्या भटक्या कुत्र्यासाठी इतकी मोठी बक्षिसाची रक्कम आणि शोधकार्य करणाऱ्या शांतीनिकेतन सोसायटीची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.