नवी दिल्ली : विविध आंदोलनकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं जंतर-मंतर आता लवकरच पर्यावरणीय कारणांसाठी आंदोलनांसाठी बंद होणार आहे. परंतु, याच मैदानावर गेल्या महिनाभरापासून एक महिला उपोषणाला बसलीय... तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लग्न करायचंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेचं नाव आहे शांती शर्मा... ४५ वर्षांच्या या महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विवाह करण्याची इच्छा आहे... शांती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा यापूर्वीही १९८९ साली एक विवाह झालाय... परंतु, लग्नानंतर एका वर्षांतच पतीनं त्यांना सोडलं... तेव्हापासून त्या एकट्याच आहेत. केवळ मोदीजीच आपल्याला समजू शकतील, असं या महिलेचं म्हणणं आहे.


मोदीजींचा विवाह जशोदा बेन यांच्याशी झालेला आहे, असं सांगितल्यानंतर या महिलेनं लगेचच म्हटलं की, होय... पण ते दोघे सध्या एकत्र राहत नाहीत. 


मोदींनी शांती यांचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला तर त्या लग्नात हुंडा म्हणून मोदींना तब्बल दोन करोड रुपये देणार आहेत. आपल्या पूर्वजांची जमीन विकून शांती हे पैसे उभे करणार आहेत. 


कोर्टाच्या आदेशानंतर जंतर-मंतरवर आंदोलन करण्यापासून रोखलं तर आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन उपोषणाला बसणार, असा निर्धारही शांती यांनी व्यक्त केलाय.