नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे कथित समर्थन करण्याचा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. काश्मिरी विद्यार्थ्याने व्हॉट्सएपवरून मेसेज पाठवल्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला आणि दक्षिणपंथील हिंदू संघटनांनी विश्वविद्यालयाला घेराव घातला आणि त्या विद्यार्थ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर देहरादूनच्या खासगी विश्वविद्यालयाने विद्यार्थ्याला निलंबित केले. बंगळूरुमध्ये देखील एका विद्यार्थ्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानमधूनही चार विद्यार्थ्यांना याच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या देऊ नये यासाठी देहरादून येथील घकमालकांवर दबाब असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात देहरादूनच्या एसएसपी कुकरेती यांना विचारण्यात आले. अद्याप यासंदर्भात कोणतीही औपचारीक तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरांतील विश्वविद्यालयात शिकणाऱ्या काश्मिरी तरुणांना काही घाबरण्याची गरज नाही. परिसर आणि हॉस्टेलच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. आम्ही काश्मिरी विद्यार्थी प्रतिनिधींच्या संपर्कात आहोत आणि देहरादूनमध्ये त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल असा विश्वास देहरादूनच्या पोलिसांनी जम्मू काश्मिरच्य पोलिसांना दिला. 



व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये काश्मिरी विद्यार्थ्याने पुलवामातील भ्याड हल्ल्याची तुलना ऑनलाईन गेम पब्जीशी केली होती. पोलिसांनी यासंदर्भात आयपीसी कलम 5050(2) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरच्या बाहेर राहणाऱ्या काश्मिरी तरुणांना कथित धमक्या दिल्या जात आहेत. कोणत्याही प्रकराच्या प्रसंगात आमच्याशी संपर्कात राहा असे आवाहन सीआरपीएफ हेल्पलाईनने शनिवारी त्यांना केले.  'मददगार' हेल्पलाईनने यासंदर्भाती एका ट्वीटमध्ये म्हटले,  यावेळी राज्याच्या बाहेर असलेल्या काश्मिरी विद्यार्थी आणि सर्वसाधारण लोकांनी अडचणीत‘@सीआरपीएफ मददगार’वर संपर्क करा. कोणत्याही कठीण परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी 24 तास टोल फ्री नंबर 14411 किंवा 7082814411 वर एसएमएस करता येणार आहे.