ऑनलाइन गेममध्ये आईच्या खात्यातून घेतलेल्या 40 हजारांचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
ऑनलाईन गेममध्ये 40 हजारांचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
छतरपूर : मध्य प्रदेशच्या छतरपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. ऑनलाइन गेममध्ये 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने 13 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट मिळाली आहे.
सुसाइड नोटमध्ये काय लिहलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोटमध्ये विद्यार्थ्यांने लिहलं की, मी आईच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले. या पैशातून फ्री फायर ऑनलाई गेम खेळायला सुरूवात केली. परंतु या 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे मी आईची माफी मागतो. यानुकसानीमुळे मी आत्महत्या करीत आहे.
पालक घरी नव्हते.
पोलिसांनी म्हटले की, विद्यार्थ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले तेव्हा ते घरी नव्हते. विद्यार्थ्याची आई राज्याच्या आरोग्य विभागात नर्स आहे आणि घटनेच्या वेळी ती रुग्णालयातच होती. विद्यार्थ्याची मोठी बहिण घरी पोहचली तेव्हा, घर आतून बंद होते. तीने याबाबत आई - वडिलांना कळवले.
त्यानंतर घराचा दरवाजा तोडण्यात आला. तर पंख्याला लटकलेले विद्यार्थ्याचे शव दिसले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.