भोपाळ : दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने असं काम केलं आहे ज्याचं सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. आयुषने त्याची संपूर्ण स्कॉलरशिप कैद्यांना दान करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्कॉलरशिपचे 27 हजार 850 रुपये 14 कैद्यांना दान केले. आयुषने हे पैसे अशा लोकांना दान केले आहे ज्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे पण दंड भरायला पैसे नसल्याने त्यांना तुरुंगातच रागावं लागत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 कैद्यांपैकी 12 इंदौर जेलमध्ये तर इतर 2 जण भोपाळ जेलमध्ये होते. हे सर्व कैदी हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात होते. एका मुलाखतीत आयुषने सांगितलं की, '2016 मध्ये भोपाळ जेलमध्ये ब्रेक केस दरम्यान एका कांस्टेबलची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मुलीचं लग्न होणार होतं, तेव्हा मी माझ्या आईला विचारलं होतं की, मी माझे स्कॉलरशिपचे 10 हजार रुपये यांनी देऊ का. त्यानंतर अशी बातमी आली की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या परिवाराला मदतीची घोषणा केली आहे.'
 
आयुषने पुढे म्हटलं की, 'यानंतर माझ्या आईने मला सांगितलं की, हे पैसे तू त्या कैद्यांना दान कर ज्यांची शिक्षा पूर्ण झाली असूनही त्यांच्याकडे दंड भरायला पैसे नसल्याने त्यांना तुरुंगातच राहावं लागत आहे.'


​आयुष किशोरने त्यांच्या शाळेतील एक हुशार विद्यार्थी आहे. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकत सुवर्ण पदम देखील मिळवले आहेत. 2016 मध्ये त्याला NATIONAL CHILD AWARD FOR EXCEPTIONAL ACHIEVEMENT IN ACADEMICS AWARDS देखील मिळाला आहे. आयुषला माजी राष्ट्रपती प्रणब मुख़र्जी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.