Teachers Day Viral Video : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते. शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमत्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. विद्यार्थी क्लास रुमची सजावट करतात आणि शिक्षकांसाठी भेटवस्तू नेतात. शिक्षका प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. (student put party spray on teacher beat in front of class on teachers day video viral today trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण एका विद्यार्थ्याला शिक्षकांसोबत चेष्टा करणं अतिशय महागात पडलं. त्याचा अतिउत्साहीपणा त्याला नडलाच. वर्गातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वर्ग शिक्षकदिनानिमित्त फुग्यांनी सजवण्यात आलं आहे. तुम्ही पाहू शकता सगळे विद्यार्थी खाली जमिनीवर बसले आहे. अशातच एक विद्यार्थी पार्टी स्प्रे फवारण्यास सुरुवात करतो. मग काय मास्तजी संतापले आणि त्यांनी विद्यार्थ्याला भर क्लासरुममध्ये मारहाण केली. आनंदाचं क्षणाचा एका सेकंदा चुरडा झाला. 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर म्हणजेच  X वरील @Bihar_se_hai या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. विद्यार्थ्याचं हे कृत्य पाहून इतर विद्यार्थीही देखील हसू लागले. 



या व्हायरल झालेल्या व्हिडीओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर यूजर्सकडून तुफान कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका यूजर्सने म्हटलं आहे की, ''शिक्षकाचा असा मार फक्त आमच्याच काळात आम्ही खाल्ला आहे. आता काय शिक्षक मुलांना हात लावू शकतं नाही.'' एकाने म्हटलं आहे की, ''हा व्हिडीओ अतिशय मजेशीर आहे.''