गोरखपूर : वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत (११) हा विद्यार्थी सेंट अँथनी स्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकत होता. वर्गशिक्षिकेने त्याला ‘शिक्षा’ केल्यामुळे त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे त्याचे वडील रवी प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नवनीतला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला.


नवनीतच्या दप्तरात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने लिहिले होते.  'आज माझा परीक्षेचा पहिला दिवस होता. माझ्या शिक्षिकेने मला सव्वानऊ वाजेपर्यंत उभे राहायला लावून मला रडवले. कालही तिने असेच केले होते. मी मरायचे ठरवले आहे. मॅडमने आणखी कुणा विद्यार्थ्यांला अशी शिक्षा देऊ नये अशी माझी अखेरची इच्छा आहे.'


नवनीतचे वडील रवी प्रकाश यांच्या तक्रारीवरून वर्गशिक्षिका भावना जोसेफ आणि शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.