कानपूर : शहरात एका मुलाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो कानपूरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. शिक्षकांकडून त्याचा मानसिक छळ होत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाही विद्यार्थ्याला माझ्याशी बोलू दिले जात नव्हते, मला शिक्षक कायम ओरडत आणि टोमणे मारत. मी दोन महिन्यांपूर्वी शाळेत प्रवेश घेतला तेव्हापासून माझ्याशी एकाही विद्यार्थ्याने संवाद साधला नाही. मला कायम टोमणे मारले जायचे, असा आरोप या विद्यार्थ्या केला आहे.


पीडित मुलाच्या आईने आरोप केला आहे की, तुझ्या शाळेच्या दप्तरात बंदूक आहे असे सांगून, माझ्या मुलाचे दप्तर तपासले जाई, तसेच काही विद्यार्थी कायम त्याला दूर ठेवत, त्याच्याशी कोणीही बोलत नसे, शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांना तसे सांगितले होते, असा आरोप मुलाच्या आईने केला आहे.


याप्रकरणी आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असल्याची माहिती कानपूरच्या पोलीस उप अधीक्षकांनी ‘एएनआय’ला दिली. 


आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. ज्यामध्ये त्याने ४ शिक्षकांची नावे लिहिली आहेत. आम्ही त्या चारही शिक्षकांची चौकशी करणार आहोत, असेही पोलिसांनी म्हटले.