Video: शाळेच्या आवारात साचलं पाणी, मुलांनी शिक्षिकेला असं काढलं बाहेर
व्हायरल व्हिडीओनंतर शिक्षिकेविरुद्ध नेटकऱ्यांचा संताप
Students Built A Chair Bridge For The Teacher: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एका शिक्षिकेला विद्यार्थी खुर्च्यांचा पूल बनवून साचलेल्या पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे. ही घटना मथुरेतील बलदेव क्षेत्रातील दघेटा ग्रामपंचायत येथील प्राथमिक शाळेतील आहे. मुसळधार पावसामुळे शाळेच्या आवारात पाणी साचलं होतं. शाळा सुटल्यानंतर बाहेर कसं जायचं असा प्रश्न शिक्षिकेला पडला. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाण्यात खुर्च्या लावण्यास सांगितलं. मग काय, त्यावरून चालत शिक्षिका बाहेर पडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
बलदेव येथील दघेटा गावातील या प्राथमिक शाळेत एकूण 7 शिक्षक आहेत. ज्यामध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. मात्र पल्लवी एकटीच खुर्च्यांच्या या पुलावरून गेली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
थोडासा जरी पाऊस झाला तर शाळेत पाणी भरते, त्यामुळे शाळकरी मुलांचे हाल होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र याकडे ना ग्रामपंचायत आणि अधिकारी देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.