श्रीदेवींच्या मृत्यूवर भाजप खासदार स्वामींनी उपस्थित केले प्रश्न
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
मृत्यूबाबत संशय
बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे. या संपूर्ण घटनेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्यामुळे श्रीदेवींचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मृत्यू की हत्या ?
भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता श्रीदेवींच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, सरकारी वकिलांच्या प्रतिक्रिये वाट पाहावी लागेल. मीडियामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्या सतत बदलत आहेत. श्रीदेवी हार्ड ड्रिंक करत नव्हत्या मग त्यांच्या शरीरात ती गेली कशी. सीसीटीव्ही कॅमरे काम का करत नाही आहेत. ? श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर मीडियासमोर येतात आणि सांगतात की अभिनेत्रीचा मृत्यू कॉर्डिअॅक अरेस्टने झाला.'
'बॉलिवूड अभिनेत्री आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये देखील संबंध आहेत यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे.' असं देखील स्वामी यांनी म्हटलं आहे.