सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी !
होळीपूर्वीच तेल कंपनींनी ग्राहकांना खूषखबर दिली आहे.
मुंबई : होळीपूर्वीच तेल कंपनींनी ग्राहकांना खूषखबर दिली आहे.
नॉन सब्सिडीप्रमाणे ( विना अनुदानीत) , सब्सिडी (अनुदानित ) देण्यात आलेल्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. कमर्शिअल वापरासाठी 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये सूट देण्यात आली आहे.
1 मार्चपासून सिलेंडरच्या किंमतीमध्ये सूट देण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
47 रूपये झाले कमी
इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सबसिडी न देण्यात आलेल्या 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 45.50 रूपये ते 47 रूपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
मुंबईत गॅस सिलेंडरच्या किंमती 47 रूपयांनी कमी झाल्याने नव्या किंमतीनुसार गॅस सिलेंडर 661 रूपयांना मिळणार आहे.
सबसिडी देण्यात येणारा सिलेंडरदेखील स्वस्त
1 मार्चपासून सबसिडी देण्यात येणारे सिलेंडरही स्वस्त मिळणार आहेत. मुंबईत 2.57रूपये कमी झाल्याने आता तो सिलेंडर 490.80 रूपयांना मिळणार आहे.
कमर्शिअल वापरासाठी मिळणारा सिलेंडरही स्वस्त
19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलेंडरवरही 77 -80 रूपयांची सूट देण्यात आली आहे. मुंबईत 79 रूपयांची सूट देण्यात आल्याने आता हा सिलेंडर 1181 रूपयांना उपलब्ध होणार आहे.