Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या दुकानातून आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णन महादेवन असे या तरुणाचे नाव असून तो जगातील मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होता. त्याला पगारदेखील खूप चांगला होता. त्याच्या गरजा पूर्ण होऊन आवडी-निवडी पूर्ण होतील, इतकी रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात येत होती. पण कृष्णनचे स्वप्न काहीतरी वेगळे होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि छोट्याशा दुकानातून इडली विकायला सुरुवात केली. बंगळुरच्या विग्याननगरमध्ये त्याचा इडलीचा स्टॉल आहे. 


वडिलांचे निधन 


2009 मध्ये कृष्णनच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा दुकान संभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि त्यांची आई उमा यांच्यावर आली. कृष्णन दुकानात काम करायचा आणि नंतर कॉलेजला जायचा. नोकरी लागल्यावरही हा दिनक्रम त्याच्यासाठी कायम होता.


इडली विकणे हा कृष्णनचा घरचा व्यवसाय आहे. 2001 साली त्याच्या वडिलांनी अय्यर इडली विकायला सुरुवात केली होती. गरमागरम आणि चवदार इडली सांबारसाठी हे दुकान परिसरात ओळखलं जातं. सर्व वयोगटातील तरुण येथे इडली खाण्यासाठी येत असतात. गेल्या 23 वर्षात कृष्णन कुटुंबाच्या या व्यवसायाने चांगली ओळख निर्माण केली आहे. 


 मऊ इडलीसाठी लोकप्रिय


अय्यर इडली हा घरचा इडलीचा व्यवसाय संभाळावा म्हणून कृष्णने बॅंकेच्या नोकरीवर पाणी सोडले.  जवळपास 19 वर्षे कृष्णणचे वडिल नारळाच्या चटणीसोबत इडल्या विकत होते. त्यांच्या चटणीची चव हजारो जणांच्या जिभेवर आहे. त्यामुळे जवळपास अनेक रेस्टॉरंट्स असूनही, अय्यर इडली आजही त्याच्या अनोख्या, फ्लफी आणि मऊ इडलीसाठी खूप लोकप्रिय आहे. 


चविष्ट मेन्यूकार्ड


कृष्णनने व्यवसाय संभाळायला घेतला आणि त्यात चांगले बदल केले. गुणवत्ता, ताजेपणा, स्वच्छता आणि चव यालाच प्राधान्य राहील, याची काळजी त्याने घेतली. सध्या कृष्णनने मेनूमध्ये वडा, केसरी भात (रवा, तूप, केशर आणि साखर घालून बनवलेले दक्षिण भारतीय मिष्टान्न) आणि खरा भात याचा समावेश केला आहे. 


खाद्यपदार्थाची उच्च गुणवत्ता राखल्यामुळे हे शक्य झाले आहे. तसं पाहायला गेलं तर अय्यर यांचं दुकानात फक्त 20 बाय 10 फूट जागेत आहे. पण असे असले तरीही अय्यर इडलीने यात आपले विश्व निर्माण केले आहे. आता अय्यर परिवार दर महिन्याला या दुकानात 50,000 हून अधिक इडल्या विकत आहे. यामध्ये कृष्णनदेखील आपल्या कौशल्याचा वापर करत आहे.