मुंबई : नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे हे खूप मोठे यश आहे, अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते रात्रीचे दिवस करतात. परंतु तरी देखील अनेकांना हे क्लिअर करणे कठीण होते. कारण त्यापैकी फक्त काही लोकांना हे यश गाठता येते. तसे पाहाता UPSC परीक्षेत पास होण्यासाठी किंवा त्यासाठी तयारी करण्यासाठी सर्व उमेदवारांची स्वतःची एक रणनीती असते, ज्याला ते फॉलो करत असतात. त्यांपैकी काही असे असतात. जे पहिल्याच परीक्षेत पास होतात. परंतु त्यांचीच ट्रिक फॉलो करुन दुसऱ्या व्यक्तीला ती परीक्षा पास करता येईल की, नाही हे सांगता येणं कठीण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला योग्य स्ट्राटर्जी आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यासाठीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी सुरभी गौतम, तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला मार्गदर्शन केले आणि ती पहिल्याच प्रयत्नात आयएएस होऊन हजारोंसाठी प्रेरणा बनली.


मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात राहणारी सुरभी गौतम लहानपणापासूनच हुशार होती. तिने 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत, कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आणि मर्यादित संसाधनांवर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. तिचे वडील दिवाणी न्यायालयात वकील आहेत आणि आई शिक्षिका.


शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरभीने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाली. गावातून उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी ती पहिली मुलगी होती. तिने भोपाळमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पूर्ण केली, जिथे तिने विद्यापीठात अव्वल स्थान मिळविले आणि तिच्या कामगिरीसाठी सुवर्णपदक देखील मिळवले.


युनिव्हर्सिटी टॉपर आणि सुवर्णपदक विजेती सुरभी गौतमने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बसण्यापूर्वी अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. सुरभी गौतमने एक वर्ष बीएआरसीमध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून काम केले. 


तिने GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलिस आणि FCI सारख्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. एवढेच नाही तर 2013 मध्ये झालेल्या IES परीक्षेत सुरभीने AIR 1 मिळवला होता.


परंतु असे असले तरी सुरभीला इंग्रजी चांगलं बोलता येत नसल्यामुळे लोक चिडवायचे आणि तिची खिल्ली देखील उडवली जायची. पण तरीही तिने आशा सोडली नाही आणि आपल्या यशाने तिने अशा लोकांना चोख उत्तर दिले आहे.