Pranjali Awasthi Success Story:  सोळावं वरीस धोक्याचं असं आपल्याकडे म्हटलं जात. पण हेच सोळाव वरीस मोक्याच करण्याचं कर्तुत्व फार कमी जण दाखवतात. आपण आज एका अशा मुलीची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने वयाच्या 16 व्या वर्षी 100 कोटींची कंपनी उभारली आहे. प्रांजली अवस्थी असे या मुलीचे नाव असून तिने आपले स्टार्टअप Delv.AI साठी  3.7 कोटी रुपयांचे स्टार्टअप फंडींग गोळा केले. आता प्रांजलीच्या या कंपनीची किंमत साधारण 100 कोटी रुपये इतकी आहे. इतक्या कमी वयात तिने ही किमया कशी साध्य केली? प्राजंलीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रांजली अवस्थी ही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. ती 11 व्या वर्षी असताना तिचा परिवार भारतातून फ्लोरिडामध्ये जाऊन राहिला. प्रांजलीचे वडील एक इंजिनीअर आहेत. मुलांना शाळांमध्ये कोर प्रोग्रामसोबत कॉम्प्युटर सायन्सदेखील शिकवायला हवे, असे त्यांना वाटते. त्यांचे हे विचार लेकीमध्ये उतरले आहेत. वयाच्या 7 व्या वर्षी प्रांजली कोडींग करायला लागली. फ्लोरिडाला पोहोचल्यावर ती खूप खूश होती कारण तिथे ती कॉम्प्यूटर सायन्सचे शिक्षण घेऊ शकत होती. 


अवघ्या 13 व्या वर्षी सुरु केली कंपनी 


13 वर्षाची असताना प्रांजली यूनिवर्सिटी रिसर्च लॅबमधून इंटर्नशिप करत असताना तिला एक कल्पना सुचली.  कोरोना काळात शिक्षण ठप्प झालं होत तेव्हा सर्वच ऑनलाइन झालं होतं. त्यावेळी प्रांजलीला 20 तास इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. यात तिने संशोधन केले, डेटा काढला आणि लिटरेचर रिव्ह्यू क्रिएट केला. 2020 मध्ये OpenAI ने जेव्हा चॅट जीपीटी 3 चे बेटा वर्जन रिलीज केले तेव्हा प्रांजलीने त्याचा वापर डेटा काढण्यासाठी आणि समराइज करण्यासाठी केला. एआयच्या माध्यमातून अडचणी सोडवल्या जाऊ शकतात, हा विचार प्रांजली करु लागली. ज्यानंतर तिची Delv.AI कंपनी उभी राहिली. त्यावेळी व्यवसाय पूर्णपणे तयार नव्हता. पण मशिन लर्निंगचा वापर करुन डेटा काढण्याचे काम सोपे करेल अशी कंपनी उभारायची आहे, हे तिच्या मनात पक्कं होतं. 


शाळा सोडून उभारली कंपनी 


2021 मध्ये प्रांजलीला Miami Hack Week  इव्हेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली. जिथे ती Backend Capitalमध्ये तिला आपले पार्टनर्स Lucy Guo और Dave Fontenot भेटले. तिने आपल्या कंपनीचा छोटा हिस्सा त्यांना दिल्यानंतर प्रांजलीला त्यांच्या 12 आठवड्यांच्या प्रोग्रामचा भाग बनण्याची संधी मिळाली. प्रांजलीच्या आईवडीलांनी नेहमी तिला प्रोत्साहन दिले. यानंतर तिने आपले शालेय शिक्षण सोडले.काही काळानंतर तिने प्रोडक्ट हंटवर Delv.AI चे बीटा वर्जन लॉंच केले. प्रोडक्ट हंट असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक फ्रीमध्ये आपले सॉफ्टवेअर शेअर करु शकतात. Delv.AI च्या मदतीने रिसर्च करणारे लोक एआयचा वार करु तीच माहिती मिळवू शकतात, ज्याची त्यांना गरज आहे. 


कंपनीचे मुल्यांकन 100 कोटी रुपये 


प्रांजलीने तिच्या फेलोशिप दरम्यान AI कम्युनिटीमध्ये आपले कनेक्शन बनवले. प्रांजलीने आतापर्यंत 4.5 लाख डॉलर इतका निधी उभारला. कंपनीने 1 डिसेंबर 2021 रोजी पहिली प्री-सीड फेरी आयोजित केली होती, ज्या अंतर्गत तिने $2.5 लाख जमा केले होते. आणि 15 जानेवारी 2022 रोजी त्यांनी दुसरी प्री-सीड फेरी केली आणि 50 हजार डॉलर्स जमा केले. यानंतर प्रांजलीने 20 जानेवारी 2023 रोजी सुमारे 1.5 लाख डॉलर्स जमा केले. आज प्रांजलीच्या कंपनी Delv.AI चे मूल्यांकन 12 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 100 कोटी रुपये झाले आहे.  Crunchbase ने यासंदर्भात माहिती दिली आहे.


पालकांकडून माझ्या शिक्षणाला प्राधान्य 


माझे आई-वडील भारतीय असून त्यांनी माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिले. जून 2023 मध्ये माझे हायस्कूल शिक्षण झाले पण कॉलेजमध्ये न जाण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय पालकांसाठी थोडा कठीण होता. पण मी ते का केले हे त्यांना समजले. मला अजून काही व्यावसायिक कौशल्ये शिकायची असतील तेव्हा भविष्यात कधीतरी कॉलेजला जाईन, असे प्रांजली सांगते.