IRS Devyani Singh Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण दरवर्षी केवळ काहींनाच त्यात यश मिळते. प्रत्येक उमेदवाराची मानसिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकजण आपापली रणनीती आखून अभ्यास करत असतो. काही विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतात आणि दररोज तासनतास अभ्यास करतात. तर काही विद्यार्थी ठराविक वेळेतच अभ्यास करतात आणि इतर वेळेत आपल्या आवडीच्या गोष्टी करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंह यांनी आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. या कर्तुत्वामुळे चहुबाजूने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, देवयानी सिंह यांनी चंदीगडच्या शाळेतून 10वी आणि 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, देवयानीने 2014 मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानीच्या गोवा कॅम्पसमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. 


इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेची तयारी करणे त्यांच्यासाठी फार सोपं नव्हतं. देवयानी सिंह यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरवातीला सलग तीन परीक्षेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही. आणखी एक प्रयत्न केला. आणि त्यांना यश मिळाले.


देवयानी 2015, 2016 आणि 2017 मध्ये यूपीएससी परीक्षेत नापास झाल्या होती. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात देवयानी पूर्व परीक्षा उत्तीर्णही होऊ शकली नाही, तर तिसर्‍या प्रयत्नात ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली, पण तिचे नाव अंतिम यादीत आले नव्हते. यातून ती निराश झाली होती.


सलग तीन वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार न मानता कठोर परिश्रम घेऊन तयारी सुरू ठेवली. देवयानी सिंह हिने 2018 च्या UPSC परीक्षेत प्रथमच यश मिळवले. एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात 222 वा क्रमांक मिळवला.


परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लेखापरीक्षण विभागात त्यांची निवड झाली. यानंतर तिने प्रशिक्षण सुरू केले, पण यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली. यानंतर 2019 च्या परीक्षेत देवयानीने संपूर्ण भारतात 11 वा क्रमांक पटकावला.


2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंह यांनी प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता, त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची.


त्या काळात कुठलेही टेन्शन न घेता देवयानी अभ्यास करायच्या. एकदा अभ्यास करायला बसल्यावर किती तास अभ्यास करायतोय हे त्यांनी पाहिलं नाही.