IAS Success Story: गेली अनेक वर्षे मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या यशाची पताका फडकावत आहेत. बोर्डाच्या परीक्षा, यूपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची टॉपर्सच्या यादी तुम्ही पाहिलात तर त्यात निर्विवाद मुलींचे यश पाहायला मिळते. दरम्यान, अनेक कुटुंब आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदना सिंह चौहान यांचा IAS बनण्यापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यांना आपल्या संघर्षाची सुरुवात घरापासून करावी लागली. शिक्षणासाठी त्यांना स्वत:च्या कुटुंबाविरुद्ध बंड करावे लागले. मनात काही करण्याची इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो, हे त्यांनी IAS बनून   सिद्ध केले.


वंदना सिंह चौहान यांचा जन्म 04 एप्रिल 1989 रोजी हरियाणातील नसरुल्लागड गावात झाला. आमच्या गावात चांगली शाळा नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. त्यानंतर मला कधी परदेशात पाठवणार? असे वंदना सारखे विचारत असायची. सुरुवातीला मी वंदनाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, असे IAS वंदना यांचे वडील महिपाल सिंह चौहान यांनी एका मुलाखतीत सांगितले.


मी मुलगी आहे म्हणून मला वडील परदेशात पाठवत नाहीत, असे वंदनाने सांगितले. दरम्यान वडिलांनी तिला मुरादाबाद येथील गुरुकुलमध्ये दाखल केले. पण कुटुंबाने याला विरोध केला. वंदनाचे आजोबा, काका, काका आणि कुटुंबातील इतर सदस्य महिपाल सिंगच्या विरोधात गेले. यातून मार्ग काढण्यासाठी बारावीनंतर वंदनाने कायद्याच्या अभ्यासासोबत घरीच राहून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. आयएएस अधिकारी होण्याच्या तिच्या ध्येयाबाबत ती खूपच गंभीर होती.


वंदना सिंह दररोज 12 ते 14 तास अभ्यास करत असत. वंदना सिंह चौहान यांनी आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठात एलएलबीमध्ये प्रवेश घेतला होता. पण कटुंबाने सहकार्य न केल्याने 
त्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. या दरम्यान त्यांच्या भावाने त्यांना खूप साथ दिली. वंदना सिंह चौहान यांनी 2012 मध्ये हिंदी माध्यमातून यूपीएससी परीक्षा देऊन त्यांनी 8वी रँक मिळवली.