Vikas Nahar Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अनेकजण पहिल्या, दुसऱ्या अपयशानंतरच निशबाला दोष देतात. काहीजण सातव्या, आठव्या प्रयत्नापर्यंत जातात. त्यानंतर दहाव्या-बाराव्या प्रयत्नातही अपयश आलं तर हे आपल्याला जमणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून दुसऱ्या क्षेत्रात नशिब आजमावतात. पण याही पुढे जाऊन काहीजण खचून जात नाहीत. आपण आज अशाच एका यशस्वी उद्योजकाची कहाणी ऐकणार आहोत, ज्यांनी तब्बल 20 वेळा अपयश पचवले. पण जिद्द हरली नाही. 21 वा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल 500 कोटी इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास डी नाहर यांची हॅप्पिलो कंपनी यशस्वीपणे व्यवसाय करताना आपण पाहतोय. पण त्याच्यामागे विकास यांच्या 20 अपयशाच्या कहाण्या आहेत. हे विसरता कामा नये. स्टार्ट अप यशस्वी करण्यासाठी त्यांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. त्यांच्याकडे 10 हजार रुपये शिल्लक राहिले होते. यातून त्यांनी 500 कोटी किंमतीची कंपनी उभी केली.


विकास नाहर यांना तुम्ही शार्क टॅंक इंडियामध्ये गेस्ट जज म्हणून पाहिले असेल. कर्नाटकच्या शेतकरी कुटुंबात विकास यांचा जन्म झाला. व्यवसायाचे बाळकडू त्यांना परिवारातून मिळाले. सर्वसाधारण मुलांप्रमाणे त्यांनीदेखील आपले शिक्षण पूर्ण केले. 


145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी


2005 मध्ये विकास यांनी बंगळूर विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लीकेशनमधून पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी जैन ग्रुपसाठी सिनीअर इम्पोर्ट मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. काही महिने येथे काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटीमधून 2008 ते 2010 दरम्यान एमबीए केले. 


30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात 'अशी' उभी केली 100 कोटींची कंपनी


20 आयडीया आपटल्या, 21 वा प्रयत्न यशस्वी 


विकास नाहर यांनी सुरुवातीला घरचा व्यवसाय संभाळला. यानंतर त्यांनी 2016 मध्ये हॅप्पीलो लॉन्च केले. ट्रेल मिक्स हे कंपनीचे पहिले उत्पादन हिट ठरले. याआधी विकास यांनी साधारण 20 नवे व्यवसाय सुरु केले होते. पण ते अयशस्वी ठरले. त्यावेळी त्यांच्याकडे अवघे 10 हजार रुपये आणि 2 कर्मचारी राहिले होते. पण त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे ऊंच भरारी घेतली. सध्या त्यांच्या कंपनीचे मार्केट वॅल्युएशन 500 कोटी इतके आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसहित इतर साईट्सवर हॅप्पीलो आपले प्रोडक्ट विकते. यामध्ये 40 प्रकारचे ड्राय फ्रूट्स, 60 पद्धतीचे मसाले आणि 100 प्रकारच्या चॉकलेटचा समावेश आहे.


बॅंकेची नोकरी सोडून छोट्या दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..