Success Story: रेल्वे स्टेशनवर कुलीचं काम करणारा जेव्हा IAS अधिकारी होतो
IAS अधिकारी होणे सोपे नसते. कोचिंग शिवाय UPSC परीक्षा पास होणार खूपच कमी लोकं असतात.
मुंबई : कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की "कोण म्हणतो की यश फक्त नशीब ठरवते, जर तुमची इच्छा शक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. इच्छाशक्तीच्या बळावर अनेकांनी मोठे यश संपादन केलंय. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे आयएएस अधिकारी श्रीनाथ यांची. एर्नाकुलम स्टेशनवर हमालाचं काम करणारा हा व्यक्ती आता आयएएस अधिकारी आहे. आपल्या घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा पास केली आणि IAS अधिकारी बनले.
काही वर्षांपूर्वीपर्यंत कुली म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथने आयएएस अधिकारी बनून जगापुढे नवा आदर्श ठेवलाय. संकट असली तरी त्याचं संधीत रुपांतर करुन कसं यश मिळवता येईल. हे त्यांनी दाखवून दिलं. अपयशाचे कारण सांगणारे अनेक जण असतात. जर त्यांना सर्व सुख-सुविधा मिळाल्या असत्या तर त्यांना जीवनात नक्कीच यश मिळाले असते, असा त्यांचा विश्वास असतो. मात्र, श्रीनाथ या लोकांपैकी अजिबात नाही. संसाधनं नसताना ही त्याची कधीच तक्रार नव्हती. श्रीनाथ यांनी आपल्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही आपल्या यशाच्या आड येऊ दिली नाही.
आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा विचार त्यांनी नेहमी केला आणि त्यामुळेच ते त्यांच्या आयुष्यात इतके यशस्वी झाले. कोचिंगशिवाय UPSC पास होणे अवघड असते. देशभरातील लाखो लोकं UPSC परीक्षा देतात आणि त्यांचे नशीब आजमावतात. त्यापैकी फक्त काही टक्केच लोकं ही परीक्षा उत्तीर्ण होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून शहरातील मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये लाखो रुपये खर्च करतात. परंतु श्रीनाथ सारखे काही उमेदवार आहेत, ज्यांना UPSC कोचिंगसाठी इतके पैसे देणे परवडत नाही, म्हणून ते स्व-अभ्यासाद्वारे ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतात.
श्रीनाथ मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे आहेत. एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर ते कुली म्हणून काम करायचे. रेल्वेच्या मोफत वायफायद्वारे ते इंटरनेटचा वापर करायचे. श्रीनाथकडे यूपीएससीच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंग सेंटरची फी भरण्याइतके पैसे नव्हते. अशा परिस्थितीत कोचिंगशिवाय ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाही, असा विचार त्याच्या मनात आला. याच कारणामुळे त्यांनी प्रथम केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या मोफत वायफायमुळे त्यांचा अवघड मार्ग सुकर झाला. स्टेशनवर बसवण्यात आलेल्या फ्री वाय-फाय वरून त्यांनी स्मार्ट फोनच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला.
श्रीनाथ यांच्यासाठी हे मोफत वाय-फाय वरदानापेक्षा कमी नव्हते. तो येथे कुली म्हणून काम करायचा आणि त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते परीक्षेची तयारी करत असे. खरे समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन श्रीनाथने केरळ लोकसेवा आयोग (KPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर श्रीनाथच्या मनात विचार आला की ते रेल्वेच्या मोफत वाय-फायच्या मदतीने आणि खऱ्या समर्पणाने यूपीएससीची परीक्षाही देऊ शकतात. आयएएस झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि तीच परीक्षा उत्तीर्णही केली.
कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. श्रीनाथ यांनी त्यांच्या जीवनातील साधनांची कमतरता कधीही त्यांच्या यशाच्या मध्ये येऊ दिली नाही. संकटातून मार्ग काढला आणि पुढे आएएस अधिकारी झाले.