Viral Story : आपल्याला रस्त्यावर अथवा कोणत्याही ठिकाणी नुसती 100 ची नोट जरी भेटली ना, तरीही आपला आनंद गगनात मावतो. कारण त्या 100 च्या नोटेत आपण खुप काही गोष्टी मोफत करू शकतो. त्यामुळे त्याचा आनंदच वेगळाच असतो. मात्र या घटनेत वेगळेच घडले आहे. एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. मात्र इतक्या पैश्यांचे तिने काय केलं असेल, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकं 270 कोटींचे तिने केले काय?


करोडोंची मालकीन बनली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरीकेत राहणाऱ्या रुथ बलून (Ruth Baloon) या महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले होते. त्यावेळेस रुथ अमेरिकेतील टेक्सासमधील डॅलस येथे बुटांच्या दुकानात काम करत होती. त्यावेळेस आलेल्या या मेसेजने ती काही सेकंदात करोडोंची मालकिन बनली होती. त्या एका वेळेसाठी ती अरबपतीच्या पंक्तीत जाऊन बसली होती.


270 कोटी खात्यात आल्यावर काय म्हणाली?


2019 मधली ही घटना आहे. यावेळी रुथ बलूनच्या (Ruth Baloon) बँक खात्यात अचानक 270 कोटींहून अधिक रक्कम आली. या घटनेनंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या घटनेवर ती म्हणाली की,सुरुवातीला कोणीतरी गिफ्ट दिल्याचे वाटले होते.


270 कोटीच केलं काय?


रुथ बलूनच्या (Ruth Baloon) बँक खात्यात अचानक 270 कोटी आल्यानंतर त्या पैशाचे काय करायचे होते, हे तिने ठरवले होते.जेव्हा ही रक्कम तिच्या खात्यात आली तेव्हा तिने त्यातील 10 टक्के चर्चला दान करण्याचा विचार केला होता. आणि तिला काही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवायची होती, असे रुथने सांगितले होते.


बँकेला परत केली रक्कम


रुथ बलूनने (Ruth Baloon) बँकेला याबाबतची माहिती दिल्यानंतर, बँकने तिला ही रक्कम चुकून तिच्या खात्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर रूथने हे पैसे बँकेला परत केले होते.


दरम्यान रुथ बलूनने (Ruth Baloon) दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे जगभरात कौतूक झाले होते. तसेच ती प्रसिद्धी झोतात आली होती. तिची स्टोरी संपुर्ण जगभरात व्हायरल झाली होती.