Sukanya Samriddhi Yojana :  तुम्हाला मुलगी आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं त्यांची मुलगी ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावी. यासाठी तुम्ही तिचासाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या योजनेमुळे तुम्हाला मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाची समस्या जाणवणार नाही.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खास योजनेने तुमची मुलगी 21 वर्षातच नक्की लखपती होईल. यासाठी तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तर या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 416 रुपयांची गुंतवणूक करायची आहे. या योजनेतर्गंत तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिला 65 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल. या योजनेमुळे जर तुमच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण येणार नाही. आता या योजनेत अजून मोठे बदल झाले आहेत. ते बदल आज आपण जाणून घेऊयात. 


सुकन्या समृद्धी योजनेतील बदल


1. खात्यात चुकीचे व्याज जमा झाल्यानंतर ते परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. तसंच प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात वार्षिक व्याज जमा केला जाणार आहे. 


2. पूर्वी मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर स्वत: खातं चालवू शकत होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता मुलीला स्वत:चे खातं चालण्यासाठी 18 वर्षांची अट घालण्यात आली आहे. मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत केवळ तिचे पालकच हे खातं चालवू शकतात.


3. जुन्या नियमाप्रमाणे या योजनेत 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर होता. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार एका मुलीनंतर जर तुम्हाला दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचेही खातं तुम्ही उघडू शकतात. 


4. जुन्या नियमानुसार खात्यात वर्षाला किमान 250 रुपये असणे गरजेच आहे. नाहीतर तुमचं खातं डिफॉल्ट मानलं जातं. मात्र आता नवीन नियमांनुसार खातं पुन्हा सक्रिय न केल्यास मॅच्युरिटीपर्यंत खात्यात रक्कमेवर लागू दराने व्याज जमा होणार आहे. या पूर्वी डिफॉल्ट खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी लागू असलेल्या दराने व्याज मिळत होता. 


5. जुन्या नियमानुसार मुलगी वारली किंवा मुलीचा पत्ता बदलला, अशा दोन परिस्थितींमध्ये सुकन्या समृद्धी खातं बंद केलं जाऊ शकतं होतं. मात्र नव्या नियमानुसार खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही यात समावेश करण्यात आला आहे. आता पालकाचा मृत्यू झाल्यास खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं.