Sukanya Samruddhi Yojana: आपल्या आपल्या मुलांसाठीही चांगले भविष्य तयार करायचे असते. त्यामुळे आपणही असाच विचार करतो की, कुठल्या कुठल्या योजनांमध्ये (Government Schemes to Invest) आपण गुंतवणूक करू शकतो. त्यातील अशीच एक योजना आहे आणि म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojna). आपल्या असं वाटतंच असते की गुंतवणूक करताना आपण मोठ्या रकमेनं सुरूवात करावी परंतु आपण छोट्या रकमेपासूनही सुरूवात करू शकतो आणि त्यासाठी चांगली गुंतवणूकही (Smll Investment) करू शकतो. त्यातून भविष्यात आपल्याला चांगले रिटर्न्सही मिळू शकतात. यानं आपल्या मुलींचे स्वप्न तर पुर्ण होईलच पण त्याचबरोबर आपल्याला या योजनेचा सर्वाधिक फायदाही करून घेता येईल. चला तर मग या लेखातून सविस्तर जाणून घेऊया ते म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेबद्दल. (Sukanya Samrudhhi Yogana gives 7.6 percent interest rate for 15 years of investment intest 500 per month know more business news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकन्या समृद्धी योजनेतून तुम्ही दर महिन्याला 500 रूपये इन्व्हेस्ट (Invest 500 Rupees in SSY) करू शकता. या योजनेतून तुम्ही 250 रूपयांपासून 1.50 लाख रूपयांपर्यंत पैसे गुंतवू शकता. ज्यांचे वडील हयात आहे आणि ज्या मुलींचे वय हे 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. तो परिवार या योजनेसाठी (Sukanya Samruddhi Yojana Eligibilty) पात्र आहे. त्यानुसार तुम्ही या योजनेतून गुंतवणूक करू शकता. 


असे करा तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित 


या योजनेतून जर का तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमची ही स्कीम 21 वर्षांपर्यंत मेच्युअर (Mature) होते. सलग 15 वर्षे तुम्ही ही योजना घेऊ शकता. ही योजना काहीशी एलआयसी विम्याप्रमाणे आहे. जर का 500 रूपये तुम्ही पुढची 15 वर्षे गुंतवलेत तर तुम्हाला त्यासाठी 500x12 म्हणजे 6000 रूपये काढावे लागतील. 2023 मध्ये तुम्ही नव्या तऱ्हेनं या योजनेची सुरूवात करू शकतात. यामध्ये तुम्हाला 21 वर्षांपर्यंतची मेच्युरिटी मिळते. म्हणजेच जर का तुम्ही यावर्षी तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक केलीत तर ही गुंतवणूक 2044 मध्ये मेच्युअरल होईल. यामध्ये तुम्हाला 80 c नुसार टॅक्स सवलतही (Tax Benefits) मिळेल. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्क्यांचे व्याज मिळेल. 


तुम्ही जर का 15 वर्षाला 90,000 रूपये गुंतवत असाल म्हणजे दर महिना 6000 गुंतवत असाल तर 1,64,606 या व्याजानुसार मेच्युरिटीनंतर (Maturity Period) तुम्हाला 2,54,606 इतकी रक्कम मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुंतवणूकीनूसार हिशोब करू शकता. त्यामुळे आपल्यालाही यातून चांगला फायदा होईल आणि तुम्हीही तुमच्या मुलीचे स्वप्न साकार करत तिचे भविष्य सुखरूप करू शकता. तेव्हा वाट कसली पाहताय?