Sula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Sula Vineyards IPO: वाईन तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सूला वाईनयार्ड्स लवकर शेअर बाजारात आपला आयपीओ आणणार आहे. सेबीनं मंजुरी दिल्यानंतर आयपीओचा मार्ग खुला झाला आहे. स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झालेली पहिली वाईन बनवणारी कंपनी आहे. आयपीओच्या माध्यमातून आता पैशांची उभारणी करणार आहे. त्याचबरोबर चांगला परतावा मिळेल या हेतून गुंतवणूकदारांना गुंतवणूकही करता येणार आहे. 12 डिसेंबर 2022 ला अर्जासाठी आयपीओ खुला होणार आहे. गुंतवणूकदार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. आयपीओची किंमत लवकरच जाहीर केली जाईल. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 950 ते 1000 कोटी रुपये उभे करणार आहे.
सूला वाईनयार्ड्स कंपनीने एप्रिल आणि जुलै 2022 मध्ये सेबीकडे आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रं सादर केली होती. त्यावर 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत सेबीनं चाचपणी केली आणि त्यानंतर आयपीओसाठी मंजुरी दिली आहे. सूला वाईनयार्ड्स आता ऑफर फॉर सेलद्वारे पैसा उभा करणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
बातमी वाचा- Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
सूला वाईनयार्ड्सची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली होती. मागच्या 19 वर्षात ब्रँडनं आपलं नाव बाजारात कमावलं आहे. 31 मार्च 2021 मध्ये सूला हा ब्रँड भारतातील प्रमुख उत्पादक म्हणून समोर आला. सध्या, कंपनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये असलेल्या चार मालकीच्या आणि दोन भाडेतत्त्वावरील प्लांटमध्ये 13 ब्रँडच्या नावाखाली 56 विविध प्रकारच्या वाइनचे उत्पादन करते. कंपनीच्या वितरण प्लॅटफॉर्ममध्ये 31 मार्च 2022 पर्यंत 47 हून अधिक वितरक, 10 कॉर्पोरेशन, 23 परवानाधारक पुनर्विक्रेते, 7 कंपनी डेपो, 4 संरक्षण युनिट्स आणि 23,000 हून अधिक पॉइंट ऑफ सेल यांचा समावेश होता. कंपनीचे दोन वाईन रिसॉर्ट नाशिकमध्ये आहेत.