Upcoming IPO: येत्या काही दिवसांनंतर नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे.  मात्र त्यापूर्वी अनेकांना २०२२ च्या डिसेंबर महिन्यात मोठी कमाई करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध होत  मिळत आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला विनयार्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आज गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दरम्यान Sula हे नाव मद्याच्या चहात्यांना माहिती नाही, असे होणार नाही. नाशिकमधील सुलाने जागतिक ब्रँड म्हणून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुला वाईनयार्ड्स आयपीओ (Sula Vineyards IPO) लवकरच बाजारात येणार आहे. या इश्यूचा साईज (Issue Size) 960.35 कोटी रुपयांचा असेल. हा आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात दाखल होत आहे. हा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल (Offer For Sale) राहणार आहे. आजपासून ( 12 डिसेंबर 2022) पासून सुला विनयार्ड्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) खुला होणार आहे. इच्छूक गुंतवणूकदार या आयपीओत 14 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात आहे. आयपीओसाठी 340 ते 357 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.


वाचा : वाहनचालकांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरील वाहतूक आजपासून बंद, असे असतील पर्यायी मार्ग 


कंपनीने लॉन्च होण्यापूर्वी 1200-1400 कोटी रुपयांपासून इश्यू साइज कमी केला आहे. आता इश्यू साइज 960.35 कोटी रुपये असेल. कंपनीने IPO साठी शेअर्सची किंमत निश्चित केली आहे. तो प्रति शेअर 340-357 रुपये ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार, त्याची लॉट साइज 42 शेअर्सची असेल. पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS), या इश्यू कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान शेअर्सधारकांसाठी विक्री ऑफर करतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, OFS हा कंपनीचे शेअर्स विकण्याचा एक मार्ग आहे, ज्यामध्ये लिस्टेड कंपनीच्या प्रवर्तकांना त्यांचे विद्यमान शेअरहोल्डिंग पारदर्शक पद्धतीने कमी करण्याची संधी मिळते.  स्टॉक मार्केट लिस्टिंगनंतर, सुला विनयार्ड्स स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण करणारी देशातील पहिली प्युअर-प्ले वाइन उत्पादक असेल.     


14 डिसेंबरपर्यंत पैसे गुंतवता येणार


सुला विनयार्ड्सने मात्र IPO अंतर्गत विकल्या जाणार्‍या समभागांची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु इश्यू लॉन्चची तयारी पूर्ण झाली आहे आणि किंमत बँड कधीही अनावरण केले जाऊ शकते. सुला विनयार्ड्सचा हा IPO 12 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल आणि गुंतवणूकदार 14 डिसेंबरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतील.