मुंबई: 2020-21 वर्षात अनेक वातावरणात वेगान बदल होत असल्याचं दिसल. अवकाळी पाऊस कधी थंडी तर कधी कडकडीत उन्हाचे चटके आणि मध्येच येणाऱ्या धो-धो पावसामुळे उडणारी तारांबळी असं काहीसं वर्ष 2020चं सरलं. पण पर्यावरणात वेगवेगळे बदल होत आहेत आणि त्याचा परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर गोलार्धात उन्हाळ्याचा कालावधी 6 महिने होईल असा गंभीर इशारा संशोधकांनी दिला आहे. याचा परिणाम जसा सतत बदलत्या हवामानावर होतो तसात शेती, आरोग्य आणि इतर घटकांवरही मोठा परिणाम होणार आहे. चीनमधील विज्ञान अकादमीने या संदर्भात संशोधन केलं असून जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या नियकालिकात प्रसिद्द करण्यात आला आहे. 


संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 1952 ते 20211 या कालावधीमधील बदलत्या हवामानाचा अभ्यास केला. त्यानुसार पुढच्या काळात काय स्थिती असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1952 ते 2011 या कालावधीमध्ये उन्हाळ्याचे दिवस वाढल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे. 


आकडेवारीनुसार विचार करायचा झाला तर 1952 पासून 2011 पर्यंत उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याचा कालावधी उन्हाळ्याचे 17 दिवस वाढले आहेत. म्हणजेच 78 दिवसांवरून तो 95 दिवसांपर्यंत वाढला असं म्हणता येईल तर हिवळ्याचे दिवस 76 वरून 73वर आले आहेत. वसंत ऋतु 124 वरून 115 तर शरद ऋतुचा कालावधी 87 वरून 82 दिवसांवर आला आहे. हिवाळा हा अपेक्षेपेक्षा उशिरानं सुरू होत आहे तर लवकर संपून उन्हाचे चटके वाढत असल्याचं जाणवत आहे. 


बदलाचा हा वेग कायम राहिल्यास उत्तर गोलार्धात या शतकाच्या अखेरीस हिवाळा दोन महिन्यांपेक्षा कमी काळ असेल, तर उन्हाळा सहा महिने असेल असं संशोधकांनी अहवालातून समोर आणलं आहे. याचा परिणाम म्हणून वेगानं ऋतुचक्र बदलताना आपल्याला दिसत आहे. 


पन्नासच्या दशकात उत्तर गोलार्धात चार हंगाम अपेक्षित वेळी येत होते. गेल्या काही वर्षांपासून आता वातावरणात मोठे बदल दिसत आहेत. हे बदल येत्या काळात आणखी तीव्र होत जातील. हिवाळ्याचा कालावधी कमी होऊन उन्हाळा वाढण्याची शक्यता आहे. 


या बदलत्या ऋतुचक्राचा परिणाम आपल्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. तर निसर्गातील अन्नसाखळी आणि वनस्पती-पर्यावरणावर परिणाम होणार आहे. त्याचा शेतीवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.