नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने समन्स पाठविले आहे. त्यामुळे थरुर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना आरोपी मानले आहे. त्यामुळे थरुर यांना ७ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशआज दिले. आरोपपत्रानुसार, थरुर यांनीच सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी ३००० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या आधारे न्यायालयाने थरुर यांना आरोपी मानले आहे. या प्रकरणी अनेकदा पोलिसांनी थरुर यांची चौकशी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे थरुर यांच्या अडचणीत वाढ झालेय.



दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात कलम ३०६ आणि ४९८ अंतर्गत आरोपपत्र दाखल केलेय. दिल्ली पोलिसांनी कलम ३०६नुसार, थरुर यांच्यावर सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर घरगुती हिंसाचार प्रकरणी कलम ४९८ ए देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे थरुर यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेय.



सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील लीला पॅलेस या फाइव्ह स्टार हॉटेलच्या ३४५ क्रमांकाच्या रुममध्ये संशयितरित्या मृत्यू झाला होता. या मृत्यूला पहिल्यांदा आत्महत्या दाखवण्यात आले होते. मात्र, एक वर्षानंतर विसेरा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.