Suniel Shetty: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नारायण मुर्ती यांची. काही दिवसांपुर्वी जगातील स्पर्धेत टिकायचं असेल तर भारतीय तरूणांनी आठवड्याला 70 तास काम करावं असं त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले होते त्यावरून नानाविध कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. अनेक मोठमोठ्या उद्योगपतींनी त्यांच्या या वक्तव्यावर आपली मतं मांडली आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. काहींना त्यांच्या या वक्तव्यावर अहसमती दर्शवली होती कर काही जणं हे त्यांच्याशी सहमत होते. नेटकऱ्यांनी तर त्यांना यावरूनही ट्रोल केले आहे तर काहींनी तर सरळ ऋषी सुनक यांनाही यामध्ये आणलं आहे. यावेळी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून अनेक तज्ञांनीही कमेंट्स केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधा मुर्तींनीही यावेळी त्यांच्या या वक्तव्यावर आपलं मत मांडलं आहे. सध्या या सगळ्यात आता अभिनेता सुनील शेट्टींचे वक्तव्यही चर्चेत आहे. सुनील शेट्टीही अनेकदा आपल्या विविध वक्तव्यांसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याचीही अनेकदा चर्चा असते. अनेकदा तो विविध गंभीर मुद्द्यावरही बोलताना दिसतो. त्यामुळे त्याचाही जोरात चर्चा असते. त्याला अनेकदा प्रॅक्टिकल सेलिब्रेटी म्हटले जाते. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार सुनील शेट्टीनं आपल्या लिकंडिन अकांऊटवरून यावर कही मुद्दे मांडले आहेत. यात तो म्हणाला की, हा काही वाद घालण्याचा विषय नाही. मी ज्या तऱ्हेने आजकाल आजूबाजूला परिस्थिती पाहतो आहे त्यावरून आपण नारायण मुर्ती यांच्या या निर्णयाचा विरोध करायला नको. तरूणांनी त्यांचा सल्ला ऐकवा. तुम्ही आधी त्यांचे हे म्हणणे नीट ऐकायला पाहिजे आणि त्याचे स्वत:हूनच आकलन करणे महत्त्वाचे आहे. मग त्यांना जे ठीक वाटेल ते त्यांनी करावं. त्यासाठी त्यांनी आधी त्यांचे हे म्हणणे ऐकावे आणि त्यावर विचार करावा. 


हेही वाचा : इटलीतल्या भीषण अपघातानंतर 'स्वेदस' फेम अभिनेत्री पतीसह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; VIDEO व्हायरल


माझ्यासाठी 70 किंवा 100 वर्किंग ऑवरची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आपल्याला आपल्या कमर्फेट झोनमधून बाहेर काढते. आपण ज्याप्रमाणे आपल्या परिवारासाठी, मित्रांसाठी आपल्या आरोग्यासाठी वेळ काढतो त्यातून आपल्याला ही गोष्टही लक्षात घेणं आवश्यक आहे की जगही फार मोठ्या प्रमाणात बदलते आहे. क्रिकेटमध्ये विराट कोहली, चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, बिझनेसमध्ये रतन टाटा आणि विज्ञानमध्ये डॉ. कलाम यांच्याकडे पाहा. ही खरंच खूप चांगली उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या कामातून खूप चांगली कामगिरी करत आहेत. यावेळी या पोस्टमधून त्यांनी तरूणांना सल्ला दिला आहे.