Gayatri Joshi and Vivek Oberoi: इटलीत झालेल्या भीषण अपघातानंतर अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ऑबेरॉय याच्यासह पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाली आहे. गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ऑबेरॉय यांचा इटलीत फार मोठा अपघात झाला होता. त्यातून आता ते दोघं हे सावरले आहेत. या अपघातात दाम्प्त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी गायत्री जोशीनं सुंदर वनपीस घातला होता. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या पतीसोबत यावेळी तिनं पापराझींना पोझेस दिल्या होत्या.
इटलीत गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ऑबेरॉय हे दोघं फिरायला गेले होते. तेव्हा सार्डिनिया येथे त्यांचा कार अपघात झाला होता. दोन तीन सुपरकार्सनी यावेळी एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ही कॅम्परवॅनच जोरात धडक दिली होती. ती कार मग तेव्हा जोरात उलटली. यामध्ये मागे असलेल्या फरारी कारला जोरात आग लागली होती आणि त्यात वृद्ध स्विस दाम्पत्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या धडक झालेल्या कारपैंकी एक लॅंबॉर्गिनी सुपरकारमध्ये गायत्री आणि विकास होते. त्यातून ते बचावले. या अपघातानंतरचे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अपघाताप्रकरणी गायत्री जोशी आणि विवेक ऑबेरॉय यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांची जोरात चर्चा होती. त्यानंतर या महिन्यातच ते दोघं मुंबईत आपल्या राहत्या घरी परतले होते. मीडियापासून काही काळ ते दोघं दूर होते परंतु आता काल नुकत्याच झालेल्या जिओ वर्ल्ड प्लाझाच्या ओपनिंगला ते दोघं स्पॉट झाले होते. त्यामुळे यावेळी त्यांची जोरात चर्चा होती.
गायत्री जोशी ही 2004 साली आलेल्या शाहरूख खानसोबतच्या 'स्वदेस' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दिसली होती. हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यानंतर गायत्री जोशी ही फारशी प्रेक्षकांसमोर आलेली नव्हती. त्यानंतर ती वॉन्टेड या चित्रपटातून दिसली होती. परंतु आता ती आपल्या पतीसोबत बिझनेस करताना दिसते आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. शाहरूख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे सोबत त्याचा आता डंकी हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या शाहरूख खानची जोरात चर्चा आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी शाहरूख खानला शुभेच्छा दिल्या आहेत.