नवी दिल्ली :  त्रिपुरामध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे सुनील देवधर यांना भारतीय जनता पार्टी ओडिशाला पाठविण्याची तयारी करत आहे. बीजू जनता दलाचे नवीन पटनायक गेल्या १८ वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुरात माणिक सरकार यांची प्रतिमा जशी स्वच्छ होती. तशीच ओडिशाच्या नवीन पटनायक यांची प्रतिमा स्वच्छ आहे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका आहेत.  २०१७ मध्ये स्थानिक निवडणुकीत ओडिशा संघटना मजूबत करण्यासाठी भाजपने सौदान सिंग यांना जबाबदारी दिली होती. त्यांनी ही जबाबदारी योग्य रित्या सांभाळली आणि भाजपला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. सौदान सिंग यांच्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला जबरदस्त टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 


छत्तीसगडची जबाबदारी आता सौदान सिंग यांच्याकडे 


या वर्षीच्या शेवटी छत्तीसगड विधानसभेची निवडणूक होत आहे. या ठिकाणी गेल्या १५ वर्षांपासन भाजपचे रमणसिंग मुख्यमंत्री आहेत. भाजप आपला गड वाचविण्यासाठी सौदान सिंग यांच्यावर छत्तीसगडची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यस्त असणार असल्याने ओडिशाकडे ते लक्ष्य देऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी सुनील देवधर यांच्याकडे देण्याची शक्यता आहे.