नवी दिल्ली : आफ्रिकेतली गुंतवणुक ही माझी सर्वात मोठी चूक, असं भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटलंय.


आफ्रिकेतल्या बाजारात प्रवेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत झालेल्या टायईकॉन इव्हेंटमध्ये सुनील मित्तल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. २०१० मध्ये भारती एअरटेलने आफ्रिकेतल्या बाजारात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी प्रचंड गुंतवणुक केली होती. तब्बल ११ बिलियन डॉलर्स ओतत एअरटेलने आफ्रिकेतल्या टेलिकॉम सेक्टरमधल्या झैन टेलिकॉमची मालमत्ता विकत घेतली होती. 


व्यवहारात फायदा नाही


२०१० मध्ये आफ्रिकेत गुंतवणुक करण्याचा माझा निर्णय हा चूकला होता. यामुळे पुढची सहा-सात वर्षं या गुंतवणुकीला सांभाळण्यात आणि यातून स्थिरस्थावर होण्यात खर्ची घालावी लागली. तरीही असून म्हणावा तसा फायदा या गुंतवणुकीतून होत नसल्याचं सुनील मित्तल यांनी सांगितलं.


मार्ग काढायचा जबाबदारी माझी


अर्थात ह्यातून पुढं कसं जायचं हे मी बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तुम्ही ठामपणे त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्यातून मार्ग कसा काढायचा ही माझी आणि माझ्या टिमची जबाबदारी असल्याची भावना मित्तल यांनी व्यक्त केली. 


चूकांमधून पूढे जायचंय


आफ्रिकेत गुंतवणुक न करता तो वेळ आणि ती ताकद मी जर भारतातला व्यवसाय वाढवण्यासाठी खर्ची केली असती तर आजचं चित्र वेगळ असतं, असंही ते म्हणाले. पण व्यवसाय करत असताना तुम्ही चूका करत असतातच. आपण त्या ओळखून स्विकारल्या पाहिजेत आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे.
त्यातच रिलायन्स जिओने एअरटेलसमोर टेलिकॉम क्षेत्रात तगडं आव्हान निर्माण केलंय. त्या पार्श्वभूमीवर सुनील मित्तल यांच्या विधानाचं महत्व मोठं आहे.