Viral Video: क्रेझ असावी तर अशी! `गदर 2` पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात...
Sunny Deol Crazy Fans Reached With Tractors: राजस्थानमध्ये ट्रॅक्टरवर Gadar 2 पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीये. हे पाहून मला खूप आनंद का झालाय. याचा अंदाज लावण्यासाठी कोणतीही बक्षिस नाही, असं आनंद महिंद्रा (Anand Mahindra) म्हणाले आहेत.
Sunny Deol Blockbuster Hit Gadar 2 : अभिनेता सनी देओल याचा 'गदर 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळतंय. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता त्याच्या सिक्वेलची क्रेझ पहायला मिळत आहे. रविवारी या चित्रपटानं 49.50 ते 51.50 कोटींची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे तर आत्तापर्यंत चित्रपटाचं नेट कलेक्शन 83.18 कोटी (Gadar 2 Box Office Collection) रुपयांपर्यंत गेलंय. अशातच आता देशाच्या विविध भागातून व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
'गदर 2' या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एवढा उत्साह आहे की, सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारऐवजी ट्रॅक्टर आणि ट्रक पार्क करताना दिसले. प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल 20-20 लोक भरून आले होते. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याची माहिती मिळाली आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केलाय.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
राजस्थानमध्ये ट्रॅक्टरवर Gadar 2 पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीये. हे पाहून मला खूप आनंद का झालाय. याचा अंदाज लावण्यासाठी कोणतीही बक्षिस नाही, असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. गदर 2 सिनेमा रिलीज होण्यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गदर 2 सिनेमाचं आणि कंपनीचं प्रमोशन करण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर सनी देओलने आनंद महिंद्राचे आभार देखील मानले होते.
कसा आहे Gadar 2?
फुल टू अॅक्शन अन् सनी भाईचा धमाका...जिथं पिच्चर संपतो, तिथूच सुरू होते, गदर टू ची कहाणी... पाकिस्तानमधून भारतात येताना जो बापाला रेल्वे इंजिनमध्ये कोळला भरू लागणारा जित्ते आता मोठा झालाय. त्याला लागलंय अॅक्टिंगचं याड... पण भारत पाकिस्तानमध्ये खडाजंगी होते अन् असं काही होतं की... पुन्हा सिनेमात होते पाकिस्तानची एन्ट्री. हिंदुस्तान जिंदाबाद अन् तोच हॅडपम्प, पण यावेळा हॅडपम्प नाही तर सनीभाई वेगळंच काहीतरी उचलतो. जुन्या आठवणी ताज्या करणारा हा सिनेमा नक्की पहावा, असा आहे.