आज भारतात दिसणार सुपर ब्लू मून, कुठे किती वाजता पाहता येईल?
तुम्हाला जर खगोल शास्त्रात रस असेल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे. भारत आणि आसपासच्या देशात सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला या वर्षातील पहिला सुपरमून दिसणार आहे. एक वर्षानंतर भारताच्या आकाशात हे आकर्षक दृष्य बघायला मिळणार आहे.
मागच्या वर्षी 1 ऑगस्टला स्टर्जन चंद्र दिसला होता. तर 30 ऑगस्टला सुपर ब्लू मून बघायला मिळाला होता. या वर्षी एकूण चार वेळा सुपर मून दिसणार आहे. 19 ऑगस्ट नंतर 17 सप्टेंबरला दूसरा सुपरमून बघायला मिळेल असं सांगितलं जातंय. सुपर ब्लू मूनच्या वेळी चंद्र 30 % नी जास्त प्रकाशित दिसतो. तर 14 % नी जास्त मोठा बघायला मिळतो.
काय आहे सुपर ब्लू मून
ब्लू मूनचा ब्लू म्हणजेच निळ्या रंगाशी काहीच संबंध नाही. तसेच सुपरमून ही अधिकृत खगोलशास्त्रीय संज्ञा नाही. सुपरमून एक पौर्णिमा आहे जेव्हा चंद्राची कक्षा त्याला पृथ्वीच्या जवळ आणते. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा असते पण प्रत्येक पौर्णिमेला सुपरमून दिसत नाही. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 'ब्लू मून' हा शब्द विशिष्ट कालावधीत जेव्हा अनेक पौर्णिमा येतात त्या घटनेसाठी वापरला जातो. ब्लू मूनचे दोन प्रकार आहेत. एका ऋतूतील चार सुपरमून चंद्रांपैकी तिसरा चंद्र 'सीझनल ब्लू मून' असतो. जेव्हा कॅलेंडरच्या एकाच महिन्यात दुसरी पौर्णिमा असते तेव्हा ब्लू मून येतो. त्यामुळे यंदाचा ब्लू मून ही चार हंगामातील तिसरी पौर्णिमा आहे.
कधी दिसतो सुपरमून
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो. नासाने सांगितल्या प्रमाणे, जेव्हा अमावस्या किंवा पौर्णिमा येते आणि चंद्र पृथ्वीच्या 90 टक्के जवळ येतो तेव्हा सुपरमून होतो.
भारतात कधी दिसणार सुपरमून
भारतात सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2:26 वाजता पौर्णिमा सुरू होणार आहे. म्हणजेच ब्लूमून अधिकृतपणे दुपारी 2:26 वाजता उगवेल. सोमवारी रात्रीही तो तसाच दिसेल. चांगल्या हवामानात सुपरमून सहज पाहता येईल. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आज रात्री 11:26 वाजता ब्लू मून दिसेल.