मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची पॉलिसी सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. त्यामुळे लोक त्यात गुंतवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेत तुम्हाला 1 रुपयाच्या बदल्यातही जबरदस्त नफा मिळेल. ही पॉलिसी विमा संरक्षासोबत बचतीचीही सेवा देते.


या योजनेची अनेक फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Jeevan Shiromani ही एलआयसीची गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. LIC जीवन शिरोमणी योजना 19 डिसेंबर 2017 रोजी लाँच करण्यात आली. ही एक नॉन-लिंक केलेली, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. ही मार्केट लिंक्ड प्रॉफिट स्कीम आहे. 


LIC ची योजना (Jeevan Shiromani Plan Benefits) ही एक नॉन-लिंक योजना आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1 कोटी रकमेची एश्योर्ड रक्कमेची हमी मिळते. एलआयसी आपल्या ग्राहकांना त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या पॉलिसी सादर करीत असते. वास्तविक, या पॉलिसीमध्ये किमान परतावा 1 कोटी रुपये आहे. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांसाठी एक रुपया जमा केला तर तुम्हाला एकूण एक कोटीपर्यंत परतावा मिळेल.


पूर्ण योजना काय आहे?


LIC ची जीवन शिरोमणी ही योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू केली होती. ही एक नॉन-लिंक केलेली, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे.  ही योजना खास HNI (हाय नेट वर्थ व्यक्ती) साठी बनवली आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी देखील संरक्षण प्रदान करते. 


आर्थिक सहाय्य मिळवा


जीवन शिरोमणी योजना पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला पॉलिसी सुरू असताना गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य प्रदान करते. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते.


सर्व्हायव्हल बेनिफिट 


सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणजेच पॉलिसीधारक जिवंत राहिल्याने निश्चित वेळी परतावा दिला जातो. 


तुम्हाला किती कर्ज मिळेल ते जाणून घ्या


या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे कर्ज घेऊ शकतो. पण हे कर्ज फक्त एलआयसीच्या अटी आणि शर्तींवरच मिळेल. पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणार्‍या व्याजदरावर उपलब्ध असेल.