नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील महत्वाच्या खटल्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यास न्यायालयानं मान्यता दिली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयीन सुनावणीचं थेट प्रक्षेपण केल्यानं कारवाईतील पारदर्शकता वाढेल असा युक्तीवाद करण्यात आला होता. त्यावर खंडपीठानं सकारात्मक पावलं उचलण्यावर भर दिला होता. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी थेट प्रक्षेपणाच्या बाजूनं निरीक्षण नोंदवलं आहे.


मोठ्याप्रमाणात झालेली तंत्रज्ञानाची प्रगती बघता, आपणही बदल आपलेसे करण्याची वेळ आली आहे असं न्यायमूर्तींनी सुनावणीत म्हटलं आहे.