नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात आश्चर्यकारक वाढ करण्यात आलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी न्यायाधीशांच्या वेतनवाढी विषयक विदेयकाला मंजुरी दिलीय. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचं मासिक वेतन २.८० लाख होणार आहे. 


न्यायाधीशांच्या वेतन वाढीच्या विधेयकाला हिवाळी अधिवेशनात संसदेत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. 


ही मंजुरी मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांचं वेतन जवळपास अडीच लाखांच्या घरात पोहचलंय. आत्तापर्यंत त्यांना दीड लाख वेतन मिळत होतं. उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचं वेतनही २.२५ लाख होणार आहे. 


सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी ध्यानात ठेवून ही वाढ करण्यात आलीय. जानेवारी २०१६ पासून ही वाढ लागू होणार आहे.