नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी आता खटला चालणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी फडणवीस यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. त्यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.



फडणवीस यांनी २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील दोन गुन्हे लपवले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला चालवण्याचे निर्देश नागपूरमधील न्यायालया दिले होते. त्यानंतर फडणवीस यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ओपन कोर्टात सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. मात्र, आजच्या सुनावणीच्यावेळी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली.


0