नवी दिल्ली : अयोध्या राम जन्मभुमी वाद प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी अशी याचिक सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. नियुक्त केलेल्या मध्यस्थ समितीने 18 जुलै पर्यंत आपला अहवास सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यातूनही काही ठोस निर्णय निघत नसेल तर याप्रकरणी रोज सुनावणी करण्यावर विचार होईल असे न्यायालयाने म्हटले. सर न्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या संविधानिक पीठाअंतर्गत याचिकेवर सुनावणी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुनावणी दरम्यान वकील राजीव धवन यांनी मध्यस्त प्रक्रियेवर प्रश्न उभे करणारी याचिका फेटाळण्याची मागणी केली. पण निर्मोही आखाड्याने गोपाल सिंह यांच्या याचिकेचे समर्थन केले. मध्यस्थ प्रक्रिया योग्य दिशेने पुढे जात नसल्याचे त्यांनी म्हटले. याआधी आखाडा मध्यस्थ पक्षाच्या बाजुने होता. मुस्लमि पक्षकरांच्या बाजुने राजीव धवन यांनी याला विरोध केला. ही वेळ मध्यस्थांवर टीका करण्याची नसल्याचे ते म्हणाले.