आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी चिदंबरम यांना मोठा दणका
आयएनएक्स मीडिया फेरफारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना मोठा दणका
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. चिदंबरम यांचा जामीन न्यायालयाने फेटाळलाय. चौकशीसाठी कोठडी आवश्यक असल्याची सीबीआयची बाजू न्यायालयाने मान्य केलीय. ईडीकडून होणाऱ्या अटकेविरोधात चिदंबरम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपतेय. ईडीच्या अटकेआधी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने ईडीकडून चिदंबरम यांना अटक होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
त्यामुळे चिदंबरम यांना ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती बोपन्ना यांच्या खंडपीठाने चिदंबरम यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे.
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शविला होता. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असे त्यांनी म्हटले होते.
जर चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला असता तर विजय मल्ल्या, मेहुल चौकी, नीरव मोदी, शारदा चिट फंड, टेरर फंडिंग यासारख्या खटल्यावर याचा थेट परिणाम झाला असता. पुरावा दाखवून अटक करण्याच्या मागणीचा तुषार मेहता यांनी विरोध केला. जो आरोपी उघडपणे फिरतोय त्याला पुरावे दाखवणे म्हणजे ते मिटविण्यासारखेच असल्याची बाजू त्यांनी मांडली होती.