मुंबई : फरार उद्योगपती विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. 2017 सालातील प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला शिक्षा सुनावली आहे. मल्ल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 मध्ये कोर्टाचा अवमान केल्याबद्दल मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. तर परदेशात ट्रान्सफर केलेले 320 कोटी रुपये व्याजासह एका महिन्यात जमा करा, नाहीतर मालमत्ता जप्त करू असा इशारा कोर्टानं दिला आहे. त्यामुळे आता मल्ल्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.



सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये मल्ल्याने 2017 च्या निकालाच्या पुनर्विचारासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून त्याच्या मुलांच्या खात्यात 4 कोटी डॉलर पाठवल्याने न्यायालयाने त्याला अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं.


कोण विजय मल्ल्या
विजय मल्ल्या बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्सचा मालक आहे. त्याच्यावर 17 बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे.2 मार्च 2016 साली विजय माल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला होता. विजय माल्ल्याची 13 हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने आधीच जप्त केली होती.